Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

मृत महिला व्यक्तीच्या ठेवीचे पैसे देण्यास बँकेचा नकार. महिलेचा पुरलेला सांगाडा घेऊन वारस बँकेत,

आंतरराष्ट्रीय,

राष्ट्रीय,

महाराष्ट्र,

खेळ,

राजकीय,

क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज -

मुख्यसंपादक - 

ओरिसा -ओरिसामधील एका आदिवासी  गावातील मृत महिलेचे बँकेत जमा असलेले वीस हजार रुपये वारसास देण्यास बँक अधिकाऱ्याने साफ नकार दिला.


                                                         
       

                                                        बँक अधिकाऱ्याचा उद्धटपणा.

ओरिसा राज्यातील आदिवासी खेडेगावातील एक आदिवासी महिला काही दिवसापूर्वी मृत पावली होती. सदर महिलेचे बँकेत वीस हजार जमा होते.मृत महिलेचा वारस तिचा भाऊ बँकेत पैसे काढण्यासाठी गेला असता बँक अधिकाऱ्याने  अनेक वेळा चकरा मारायला लावून कोणताही पुरावा चालणार नाही त्या महिलेलाच हजर करावे लागेल असा उद्धटपने बोलला आणि  सदर व्यक्तीस पैसे देण्यास टाळाटाळ केली.


मृत्यूचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरला नाही

महिलेचा वारस असलेला तिचा भाऊ मृत महिलेचा मृत्युचा दाखला व इतर पुरावे घेऊन अनेकवेळा बँक अधिकाऱ्याकडे गेला परंतु महिलेचे पैसे देण्यास अधिकाऱ्याने साफ नकार दिला. शेवटी महिलेच्या बँक खात्याला एकमेव वारस असलेल्या भावाने मृत महिलेचा पुरलेला मृत देहाचा सांगाडा उकरून काढला रस्त्याने चालत खांद्यावर उचलून  पुरावा म्हणून बँकेत घेऊन गेला.


सरकारने यातून बोध घ्यावा

 मृत महिलेचा पुरावा म्हणून मृत्यू झालेल्या बहिणीचा सांगाडा बँकेत घेऊन जातानाचा ओडिशातील आदीवासी व्यक्तीचा हा व्हिडिओ व्यवस्थेच्या कानाखाली दिलेली सणसणीत चपराक आहे.. तुम्ही देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची करा…. किंवा जनधन योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक व्यक्तीचं बँक खातं उघडा त्याला इथं तोपर्यंत अर्थ नाही जोपर्यंत व्यवस्थेतील झारीतल्या शुक्राचार्यांना तुम्ही सरळ करत नाही आणि माणसाला माणूस म्हणून वागणूक देण्याचं शिकवत नाही…

 

सरकार यातून बोध घेईल, ही अपेक्षा..!

Post a Comment

0 Comments

Top Post Ad