Type Here to Get Search Results !

संगमनेर पाठोपाठ श्रीरामपूरातही सापडला भोंदूबाबा ! पोटदुखीवरील उपचाराच्या नावाखाली महिलेवर आत्याचार

आंतरराष्ट्रीय,

राष्ट्रीय,

महाराष्ट्र,

खेळ,

क्राईम,

राजकीय,


नवराष्ट्र मराठी न्यूज -

navrashtramarathinews.in.com



मुख्यसंपादक -

श्रीरामपूर - संगमनेर पाठोपाठ श्रीरामपूरातही सापडला भोंदूबाबा ! पोटदुखीवरील उपचाराच्या नावाखाली महिलेवर अत्याचार.


श्रीरामपूरमध्ये पोटदुखीवर उपचार करण्याच्या नावाखाली एका महिलेची फसवणूक आणि लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबाचा पर्दाफाश झाला आहे. बेलापूर परिसरातील खटकाळी येथील गणेश माधवराव शिंदे ऊर्फ गणेश महाराज याने सन २०२३ पासून पीडित महिलेला आपल्या जाळ्यात ओढले होते. 



आजार बरा करण्याच्या नावाखाली उकळले लाखो रुपये

पोटातील अल्सर बरा करण्याच्या बहाण्याने सुरुवातीला लिंबू आणि उदी देऊन विश्वास संपादन केला आणि त्यानंतर गुंगीचे पदार्थ देऊन महिलेवर वारंवार अत्याचार केला. आजार बळावण्याची भीती आणि बदनामीची धमकी देऊन या आरोपीने महिलेला वेळोवेळी आश्रमात बोलावले. एवढेच नाही तर, जादूटोणा आणि उपचारांच्या नावाखाली त्याने महिलेकडून आतापर्यंत सुमारे १८ ते २० लाख रुपयांची रोकड आणि सोने लुटले. ऑगस्ट २०२५ आणि जानेवारी २०२६ मध्येही धमकावून अत्याचार केल्याने अखेर पीडितेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. 


पोलिसांनकडून तातडीची कारवाई

पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सध्या आरोपीवर बलात्कार आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments