आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
खेळ,
क्राईम,
राजकीय,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
मुख्यसंपादक - देविदास वायाळ पाटील,
बुलढाणा : बुलढाण्यात आज वातावरण खूप तणावपूर्ण बनलं आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहेर अचानक मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले असून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात झाली. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाने आता उग्र रूप धारण केलं असून आंदोलकांचा संताप उसळल्याचे रस्त्यावर दिसत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला.
आंदोलकांना घेतलं पोलिसांनी ताब्यात.
आंदोलन चालू असतानाच काही वेळातच परिस्थिती खूप चिघळली. आणि आंदोलक व पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर ही वादाची ठिणगी झटापटीत बदलली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ कारवाई करत काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग होता, ज्यामुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली होती.
मूळ मुद्दा होता "शिवाजी कोन होता"
या संपूर्ण प्रकरणाचं मूळ ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाशी संबंधित आहे. या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत तांबे यांच्याशी फोनवरून झालेल्या कथित वादग्रस्त संभाषणानंतर हा वाद अधिकच चिघळला. या घटनेनंतर विविध संघटना आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी गायकवाड यांच्या विरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी कठोर पावलं उचलली असून काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. तसेच प्रकाशक प्रशांत तांबे आणि त्यांच्या पत्नीला देखील स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. संभाव्य तणाव लक्षात घेता पोलिस प्रशासन पूर्णपणे सतर्क असून परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
एकंदरीत परिणाम,
एकंदरीत, बुलढाण्यातील ही घटना केवळ स्थानिक स्तरावर मर्यादित न राहता राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. येत्या काही तासांत या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Post a Comment
0 Comments