Type Here to Get Search Results !

राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या नोंदींमध्ये अधिकृत परवानगीशिवाय बदल झाल्याचा गंभीर आरोप!

 आंतरराष्ट्रीय,

राष्ट्रीय,

महाराष्ट्र,

खेळ,

क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज- 

देविदास वायाळ पाटील,




दिल्ली : राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या नोंदींमध्ये अधिकृत परवानगीशिवाय बदल झाल्याचा गंभीर आरोप राज्यसभा खासदार मा.संजय सिंग यांनी केला आहे.




राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून तात्काळ स्पष्टीकरण मागितले आहे. पक्षाची अधिकृत स्थिती, फ्लोअर लीडर पदनाम आणि नोंदींमध्ये कोणाच्या आदेशाने बदल करण्यात आला, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.




लोकशाही व्यवस्थेत कोणत्याही पक्षाच्या संसदीय नोंदींमध्ये मनमानी बदल होणे अत्यंत धोकादायक आहे. जर हे सत्य असेल, तर हा केवळ एका पक्षाचा प्रश्न नसून संसदीय पारदर्शकता आणि संविधानिक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.




नोंदी कोणी बदलल्या?


कोणाच्या आदेशाने बदलल्या?


आणि का बदलल्या?

Post a Comment

0 Comments