आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
मुख्यसंपादक - देविदास वायाळ पाटील,
लोणार तालुक्यातील वढव या गावामध्ये काल मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले. काही क्षणांतच ६-७ शेतकऱ्यांची घरे ज्वाळांमध्ये भस्मसात झाली… आयुष्यभराची मेहनत, कष्टाने साठवलेला शेतीमाल—सगळं काही राख झालं. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र अनेक कुटुंबं आज उघड्यावर आली असून त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणि एकच अपेक्षा — मदतीची!
मेहकर चे आमदार सिद्धार्थ खरात यांनी मध्यरात्री घेतली वढव कडे धाव.
मा. आमदार सिद्धार्थ खरात व नगराध्यक्ष किशोर गारोळे रात्री दीड वाजेच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेऊन मेहकर व लोणार येथील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ उपलब्ध केल्या. सकाळी चार वाजेपर्यंत आग विझवण्यात यश आले. मात्र सहा - सात शेतक-यांचे आतोनात नुकसान झाले आहे.
प्रशासनाला दिल्या तात्काळ सूचना,
आमदार सिद्धार्थ खरात यांचे सोबत नगर परिषदेचे नगराध्यक्ष किशोर गारोळे , तहसीलदार भूषण पाटील, अॅड. आकाश घोडे हेही उपस्थित होते. प्रशासनाला तात्काळ मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आगीत ग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत व योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे मा.आमदार खरात यांनी सांगितले.व या कठीण प्रसंगी आपण सर्वांनी एकत्र येऊन या कुटुंबांना आधार देणे हीच खरी माणुसकी आहे असे आव्हानही त्यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments