Type Here to Get Search Results !

मस्साजोग येथील ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा निकाल धक्कादायक, स्वरूपानंद देशमुख सरपंचपदी.

आंतरराष्ट्रीय,

राष्ट्रीय,

महाराष्ट्र,

राजकीय,

खेळ,

क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


मुख्यसंपादक -

बीड-  जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत अनपेक्षित निकाल समोर आला आहे. या अत्यंत चर्चेत असलेल्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी संतोष देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. ही पोटनिवडणूक दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर घेण्यात आली. ९ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या निर्घृण हत्येमुळे सरपंचपद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली होती. 



निवडणूक बिनविरोध व्हावी अशी होती मागणी.

दरम्यान, ग्रामस्थांच्या एका गटाने आणि देशमुख कुटुंबाने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. अश्विनी देशमुख यांना संधी देऊन दिवंगत संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न होता. मात्र, स्वरूपानंद देशमुख यांनी अर्ज मागे घेण्यास नकार देत थेट लढत स्वीकारली.


सहानुभूतीचा मुद्दा पडला मागे.

मस्सजोग निकालात मात्र सहानुभूतीचा मुद्दा मागे पडल्याचे दिसून आले. अश्विनी देशमुख यांना मोठा पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना मतदारांनी विकास आणि स्थानिक मुद्द्यांना अधिक प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले.या निवडणुकीसाठी ७ एप्रिल २०२६ पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. २८ एप्रिल रोजी मतदान पार पडले. मस्साजोगमध्ये एकूण २,२८४ मतदार असून यंदा तब्बल ८४ टक्के मतदान झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत मतदानात १० टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. सुरुवातीला मतदानाचा वेग मंद असला तरी दुपारनंतर मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी गर्दी केली. या निकालामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून स्वरूपानंद देशमुख यांच्या विजयाने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments