Type Here to Get Search Results !

सिग्नल तोडल्याने हटकलं, तिघांचं डोकं सटकलं! पुण्यात भरचौकात राडा.

आंतरराष्ट्रीय,

राष्ट्रीय,

महाराष्ट्र,

राजकीय,

खेळ,

क्राईम,

नवराष्ट्र मराठी न्यूज -

मुख्यसंपादक -

पुणे -सिग्नल तोडल्याने हटकलं. म्हणून ट्रॅफिक पोलिसावर अटॅक.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस दलातील वाहतूक विभागात कार्यरत असलेले ओहाळ हे आपल्या कर्तव्यावर तैनात होते. यावेळी एका दुचाकीवरून तीन तरुण ट्रिपल सीट येत असताना त्यांनी ट्रॅफिक सिग्नल तोडला. कर्तव्यावर असलेल्या ओहाळ यांनी त्यांना थांबवले आणि सिग्नल का तोडला, असे विचारून साधी सूचना दिली.


साध्या सूचनेवरून संताप.वाहतुकीचा नियम मोडल्याबद्दल पोलिसांनी विचारणा केल्याचा राग या तिघांना अनावर झाला. साध्या सूचनेवरूनच त्यांचे डोकं सटकले आणि त्यांनी भरचौकात ओहाळ यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या तिघांनी मिळून ओहाळ यांच्यावर हल्ला चढवला.


पोलिसाचे चार दात पाडले.

या तिघांनी ओहाळ यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण इतकी भीषण होती की, पोलीस कर्मचारी ओहाळ यांचे चार दात पडले. भरदिवसा आणि भरचौकात पोलिसावर झालेल्या या हल्ल्यामुळे आजूबाजूचे नागरिकही अवाक झाले. या घटनेनंतर जखमी पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 



Post a Comment

0 Comments