आंतरराष्ट्रीय,
महाराष्ट्र,
क्राईम,
पत्रकारसंघ,
मुख्यसंपादक- देविदास पाटील
मो. 9834285153
मेहकर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
दोन आरोपी जेरबंद
मागील चार वर्षांपूर्वीच्या मिसिंग प्रकरणातील खुनाचा थरारक उलगडा.
मेहकर, दि. २१ एप्रिल– चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेपत्ता प्रकरणाचा अखेर छडा लावत मेहकर पोलिसांनी खुनाचा धक्कादायक उलगडा केला आहे. अत्यंत सूक्ष्म तपास, गुप्त माहिती व आरोपींच्या कबुलीजबाबाच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून या प्रकरणाला पूर्णविराम देण्याची दिशा दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी मेहकर येथील एका महिलेने आपल्या पतीविरुद्ध त्रास देत असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. या तक्रारीची चौकशी सुरू असताना पोलिसांना चार वर्षांपूर्वीच्या एका बेपत्ता व्यक्तीच्या प्रकरणाचा धागा सापडला. अधिक तपासात संबंधित आरोपीने २०२२ मध्ये आपल्या साथीदारासह मिळून सुकळी येथील विनोद अश्रुबा नवले (वय अंदाजे ३४ वर्षे) यांचा खून केल्याची कबुली दिली.
आरोपींनी मृत विनोद नवले यांना मेहकर-मोळा रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. तेथे दोघांनी मिळून धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह हॉटेलच्या मागील शेतात खड्डा खोदून पुरण्यात आला. यानंतर त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट टाकून पुरावे लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
पोलिसांनी आरोपींच्या कबुलीजबाबावरून घटनास्थळी जाऊन जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन केले असता मानवी सांगाडा आढळून आला. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळावरील नमुने संकलित करण्यात आले. सांगाड्यासोबत सापडलेल्या कपड्यांवरून व इतर पुराव्यांच्या आधारे मृताची ओळख विनोद अश्रुबा नवले अशी पटविण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, चार वर्षांनंतर उघडकीस आलेल्या या प्रकरणाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी मेहकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ३००/२०२६ नोंदवून भारतीय दंड संहिता कलम ३०२ (खून), २०१ (पुरावा नष्ट करणे) व १२०(ब) (कट रचणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे.
सदरची कार्यवाही
मा. निलेश तांबे (पोलीस अधीक्षक, बुलढाणा),
मा. अमोल गायकवाड (अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा),
मा. संतोष खाडे (उपविभागीय पोलीस अधिकारी, मेहकर) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार ,
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरंजे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक अवचार,
सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नरवाडे,पोउपनि किरण खाडे. पोलीस उपनिरीक्षक गणेश कड. सहाय्यक फौजदार काळे ,गव्हाणे. राजू काळे. कटक. पवार. शिवणकर. चव्हाण. जायभाये. ठाकरे. घुगे. पोलीस कॉ. मोहम्मद. अवचार. तांबेकर. इब्राहिम. पैठणे. करीम. गरोळे. सरकटे. घोडाम. खारडे.
मेहकर पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रकरण उघडकीस आले असून, त्यांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments