Type Here to Get Search Results !

बुलडाणा डीएफओ पदी जमीर शेख यांची नियुक्ती

आंतरराष्ट्रीय,

क्राईम,

महाराष्ट्र,

पत्रकार संघ,


तीन वर्षांच्या यावल जी. जळगाव येथील कार्यकाळानंतर प्रशासकीय बदली.


बुलडाणा- 21 एप्रिल - नवराष्ट्र मराठी नेटवर्क


मुख्यसंपादक - देविदास वायाळ पाटील

मो. 9834285153



बुलडाणा डीएफओ पदी जमीर शेख यांची नियुक्ती.

एका महिन्यापूर्वी उपवनसंरक्षक सरोज गवस यांची बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते.

बुलडाणा जिल्ह्यातील वन विभागात महत्त्वाची बदली झाली आहे. सरोज गवस यांच्या ठिकाणी यावल (जि. जळगांव) येथील डीएफओ जमीर मुनीर शेख यांची बदली करण्यात आली आहे. राज्याचे महसूल व वन विभागाचे विशेष कार्य अधिकारी उदय ढगे यांच्या स्वाक्षरीने 20 एप्रिल रोजी हे आदेश जारी झाले आहे. आज मंगळवार सायंकाळी जमीर शेख बुलडाणा डीएफओ म्हणून पदाचा पदभार स्वीकारला आहे.

       जमीर मुनीर शेख हे गेल्या 3 वर्षांपासून यावल प्रादेशिक उपवनसंरक्षक म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार, एकाच ठिकाणी तीन


वर्षे पूर्ण झाल्यावर प्रशासकीय बदली करणे बंधनकारक असते. ही बदली त्याच धोरणानुसार झाली असून, वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेसाठी नियमित रोटेशन केले जाते. शेख यांचे वन संरक्षण, वृक्षारोपण आणि अवैध वनकापणीविरोधी मोहिमांमधील योगदान यावलमध्ये उल्लेखनीय राहिले आहे.

      बुलढाणा जिल्ह्यात सुमारे 18% भूभाग वनक्षेत्र असून, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेत येतो. जिल्ह्यातील वनसंरक्षणाची जबाबदारी मोठी आहे.अवैध वृक्ष कटाई, मानव-वन्यजीव संघर्ष आणि हवामान बदलाशी निगडित आव्हाने यांचा सामना करावा लागतो.सरोज गवस यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त राहिल्याने वन विभागातील कामकाजावर परिणाम झाला होता.शेख यांच्या नियुक्तीमुळे आता वन संरक्षण मोहिमांना नवीन गती मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments