आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज पोर्टल,
मुख्यसंपादक -
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर ढाबा मालक आणि त्याच्या साथीदारांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माढा-कुर्डुवाडी रस्त्यावरील उपळाई हद्दीत असलेल्या 'हॉटेल येडेश्वरी' येथे ही घटना घडली. "सगळीकडे दारू मिळते, मग तुम्हाला आम्हीच दिसतो का?" असा जाब विचारत हॉटेल मालक प्रमोद गोरे पाटील ऊर्फ गोट्या याने आपल्या साथीदारांसह अधिकाऱ्यांवर प्लास्टिक पाईपने हल्ला केला. या हल्ल्यात उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक अमित नागरे आणि जवान युवराज टिळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या ढाब्यावर विनापरवाना मद्यविक्री होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकला होता. कारवाईची प्रक्रिया सुरू असताना आणि त्याचे चित्रीकरण करत असताना आरोपीने आक्रमक पवित्रा घेतला. आरोपीने केवळ मारहाणच केली नाही, तर शासकीय कामात अडथळा आणून चित्रीकरण असलेला मोबाईलही हिसकावून घेतला. याप्रकरणी माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, मुख्य आरोपीवर यापूर्वीही अवैध दारूविक्रीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. भररस्त्यात सरकारी कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

Post a Comment
0 Comments