Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

लातूरमध्ये बुलेट मोटारसायकलचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली


आंतरराष्ट्रीय,



महाराष्ट्र,



क्राईम,


खेळ,


पत्रकासंघ,


मुख्यसंपादक -देविदास पाटील

www.navrashtramarathi.in.net



लातूर: लातूर शहरातील उस्मानपुरा परिसरात उभी असलेली बुलेट मोटारसायकल अचानक पेट घेऊन जोरदार आवाजासह फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परिसरात एकच खळबळ उडाली.. या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बुलेट मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी असताना अचानक पेट घेतला आणि त्यानंतर स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की आवाज ऐकू येताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुलेटला लागलेल्या आगीचे आणि स्फोटाचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, इंधन गळती किंवा वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad