Type Here to Get Search Results !

मेंदूतील नसा फाटल्या, नागपुरातील भयंकर घटना.तरुण अडकला मृत्यूच्या जबड्यात.जिम मधील व्यायाम ठरला घातक!


आंतरराष्ट्रीय,


महाराष्ट्र,


क्राईम,


खेळ,


मनोरंजन,


मुख्यसंपादक- देविदास पाटील


 नागपूर: धावपळीची जीवनशैली, जिममधील अतिव्यायाम आणि करिअरच्या स्पर्धेतून येणारा परीक्षेचा ताण तरुणांच्या जिवावर बेतत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. नागपूरमधील २३ वर्षीय तरुण ओम भोयर याला अशाच कारणांमुळे मेंदूघाताचा तीव्र झटका आला. त्याच्या मेंदूतील रक्तवाहिनी फाटून रक्तस्त्राव झाला. मात्र 'गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळाल्याने त्याचा प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.

नेमकी घटना काय?

ओम भोयर हा तरुण गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. परीक्षेत यश मिळवण्यासाठी तो रात्रभर जागून अभ्यास करायचा. सोबतच व्यायामाची आवड असल्यामुळे जिममध्ये तासनतास अतिव्यायाम करत होता. गेल्या आठ दिवसांपासून त्याचे डोके दुखत होते, परंतु त्याने याकडे दुर्लक्ष केलं. अखेर ताण आणि व्यायामाचा शरीरावर इतका परिणाम झाला की, त्याच्या मेंदूतील रक्तवाहिनी फुटली.

मातेची सतर्कता ठरली महत्त्वाची

ओमची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याच्या शरीराची हालचाल मंदावली. ही पॅरालिसीसची लक्षणं असल्याचं त्याच्या आईच्या त्वरित लक्षात आलं. त्यांनी वेळ न घालवता तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधला. रुग्णालयात नेल्यानंतर एमआरआय करण्यात आला, ज्यामध्ये मेंदूत अंतर्गत रक्तस्त्राव होऊन रक्ताची गुठळी झाल्याचे गंभीर निदान झालं.

'मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी'ने दिले जीवदान.


ओमची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती, तो व्हेंटिलेटरवर होता. अशा स्थितीत डॉक्टरांनी ‘मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी’ या आधुनिक शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. या प्रक्रियेत पायाच्या शिरेतून मेंदूपर्यंत एक कॅथेटर टाकण्यात आले. मेंदूत अडकलेली रक्ताची गुठळी बाहेर काढण्यात आली. यामुळे मेंदूचा रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत झाला.

डॉक्टरांच्या अचूक निर्णयामुळे आणि वेळेत मिळालेल्या उपचारामुळे चमत्कार घडला. जो रुग्ण व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत होता, तो अवघ्या १० दिवसांत स्वतःच्या पायावर उभा राहिला. सध्या ओमची प्रकृती स्थिर असून तो घरीच औषधोपचार आणि मेडिटेशन करत आहे. मेंदूघाताचा झटका आल्यानंतर पहिले ६ तास हे 'गोल्डन अवर' असतात. या काळात उपचार मिळाल्यास मृत्यूचा किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाचा धोका टळू शकतो. डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.




Post a Comment

0 Comments