Type Here to Get Search Results !

आळंदी-दिघी रोडवरील मंदिराशेजारी महिलेचं भलतंच कांड

आंतरराष्ट्रीय,


महाराष्ट्र,


क्राईम,


खेळ,


संपादक- 

पुणे,

आळंदी - दिघी रोडवरील श्री संत गुलाबराव महाराज वाङ्मय मंदिराच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या भिंतीलगत ही महिला उभी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना डोळ्याने खुणावून आकर्षित करत होती.


तिनं डोळ्यानं खुणावलं अन् पोलिसांचं लक्ष गेलं; आळंदी-दिघी रोडवरील मंदिराशेजारी महिलेचं भलतंच कांड


         आळंदी-दिघी रोडवर भररस्त्यात थांबून अश्लील हावभाव करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अद्दल घडवली. ही महिला विचित्र हावभाव करत प्रवाशांचं लक्ष वेधत होती. ही बाब लक्षात येताच  वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेवर दिघी पोलिसांनी कारवाई केली आहे. सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


ही कारवाई गुरुवारी (२३ एप्रिल) सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. दिघी रोडवरील श्री संत गुलाबराव महाराज वाङ्मय मंदिराच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या भिंतीलगत ही महिला उभी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना डोळ्याने खुणावून आणि हाताने लैंगिक हावभाव करून वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करत होती.


पोलीस कॉन्स्टेबल उदयकुमार भोसले यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गस्त घालत असताना पोलिसांना हा प्रकार दिसून आला. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अश्लील कृत्ये करून वेश्याव्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल 'अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्या'नुसार (PITA) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments