Type Here to Get Search Results !

अकोला येथील कथित लाचखोर अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड चा अटकपूर्व जामीन फेटाळला.

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


क्राईम,


मुख्यसंपादक - देविदास पाटील वायाळ


नवराष्ट्र मराठी,



अकोला-  अकोल्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांना मोठा धक्का बसला आहे. लाचखोरी आणि खंडणीप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.


अकोला येथील MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 270/2026 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विवेक बिजवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, स्टोन क्रशर व्यावसायिकांकडून दरमहा 15 हजार रुपये मागणी करण्यात येत होती. पैसे न दिल्यास कारवाई करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.


तक्रारीनुसार, 19 मार्च रोजी फिर्यादीकडून 15 हजार रुपये रोख स्वरूपात घेतल्याचाही उल्लेख आहे. तसेच इतर सदस्यांनी पैसे न दिल्यास त्यांच्या क्रशरवर मोजमाप व कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.


राज्य पक्षाने हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे सांगत कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. पुरावे गोळा करणे, रोख रक्कम जप्त करणे आणि आवाजाचे नमुने घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले.


न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपांची गंभीरता लक्षात घेऊन अटकपूर्व जामीन नाकारला. त्यामुळे आरोपीला मोठा धक्का बसला असून या प्रकरणातील तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता.

navrashtramarathinews

Post a Comment

0 Comments