राष्ट्रीय
महाराष्ट्र,
खेळ
क्राईम,
मुख्यसंपादक - देविदास पाटील वायाळ
आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ समर्थकांनी केला दुग्धाभिषेक
बुलढाणा -
बुलढाण्याचे चे आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्या समर्थनार्थ बुलढाणा येथे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक.
मागील दिवसापासून शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून वाद-विवाद सुरू आहे.आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या प्रकाशकाला गायकवाड यांचेकडून शिवीगाळ करण्यात होती.तशी ऑडिओ क्लिप व व्हिडिओ क्लिप स्वरूपात सोशिअल मीडिया वर बातम्याही व्हायरल झाल्या होत्या.
त्या प्रकरणी महिलाविषयी रागाच्या भरात आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल सोशिअल मीडिया वर दिलगिरीही व्यक्त केली. यामुळे सर्व बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
काही शिवप्रेमीनी धर्मवीर संजय गायकवाड यांना समर्थन दिले तर काहींनी आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांचा निषेध सुद्धा केला. इतिहास जाणकारांनी सोशल मीडिया व न्यूज चैनल वर आपल्या वेगवेगळ्या भावना व प्रतिक्रियाही व्यक्त केल्या.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एकेरी भाषा किंवा अपशब्द बिलकुलही खपवून घेतल्या जाणार नाही अशी रोखठोक भूमिका आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांनी घेतली होती. आणि ते आपल्या भूमिकेवर ठामही आहेत.
बुलढाणा येथे तर आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून समर्थन दिले. यावेळी "जय भवानी जय शिवराय " आणि आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! अशा प्रकारच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
मात्र काही असले तरी गेल्या दोन-तीन दिवसापासून शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पडसाद उमटत आहेत. व एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

Post a Comment
0 Comments