Type Here to Get Search Results !

भोंदूबाबाचा कारनामा, अडीच लाखात विकला बाभळीचा पाला,


  आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,



मुख्यसंपादक - देविदास पाटील वायाळ


www.navrashtramarathi.in.net


मिळालेल्या माहितीनुसार मनोहर भोसले नावाचा भोडूदुबाबा स्वतःला संत बाळूमामाचा अवतार सांगून भक्तांची फसवणूक करणाऱ्या आणि गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मनोहरमामा भोसले याच्या कृत्ये आता पुन्हा एकदा समोर येत आहेत.

पुण्यातून झालेल्या अटकेनंतर, करमाळा आणि बारामती भागातील त्याचे जुने कारनामे आणि लैंगिक शोषणाचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


कर्करोग बरा करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट


मनोहर भोसले याच्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात शशिकांत खरात यांनी फसवणुकीची फिर्याद दिली होती. "मी बाळूमामाचा अवतार असून कर्करोग बरा करतो, असे खोटे आश्वासन देऊन भोसलेने फिर्यादीला बाभळीचा पाला, साखर आणि भंडारा यांसारख्या गोष्टी चढ्या दराने विकत घेण्यास भाग पाडले. या माध्यमातून खरात यांची २ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून बारामती पोलिसांनी त्याला अटक केली होती.


आश्रमात लैंगिक शोषण: गंभीर गुन्ह्यांची नोंद


केवळ आर्थिक फसवणूकच नाही, तर भोसलेवर लैंगिक शोषणाचेही गंभीर आरोप आहेत. ९ सप्टेंबर २०२१ रोजी करमाळा पोलीस ठाण्यात एका पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, उंदरगाव येथील मठात मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदारांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या बलात्कार प्रकरणात करमाळा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते आणि १९ सप्टेंबर २०२१ रोजी न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सध्या हे प्रकरण पुन्हा चर्चेत आल्याने पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


उंदरगाव ते घोटी मठांचे जाळे आणि अंडरग्राउंड खेळ


पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर भोसलेने उंदरगाव येथील आपला मठ बंद केला होता. मात्र, त्यानंतर त्याने करमाळा तालुक्यातीलच घोटी परिसरात नवीन आश्रम थाटला. या नवीन मठात दर अमावास्या आणि पौर्णिमेला हजारो भक्त भविष्य पाहण्यासाठी गर्दी करत असत. नाशिक येथील फसवणुकीचे प्रकरण उजेडात येताच, मनोहर भोसले घोटी येथील आश्रमातून गायब झाला होता. मात्र, पुणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad