प्रतिनिधी समाधान राठोड -
हिवरा गडलिंग ता.सिंदखेड राजा या अतिदुर्गम खेडेगावातील शेतमजूर श्री तुकाराम चव्हाण यांची मुलगी रेश्मा तुकाराम चव्हाण हिने अगदी मोलमजुरी करून गावातील माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले आणि काहीतरी मोठ होण्याची जिद्द कायम ठेवत वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी जळगाव पोलीसात भरारी घेतली.
रेश्मा हिची नियुक्ती थेट जळगाव पोलीस मध्ये झाली आहे. तिच्या घरातील सगळं कुटुंब म्हणजे तिचे आई वडील,बहिण,भाऊ हे सगळे लोक मोल मजुरी करत असताना तिने शिक्षण घेत असतांना मनामध्ये जिद्द बाळगून ठेवली आणि रेश्मा ने सिद्ध करून दाखवले की कष्टाचे फळ कधी ही वाया जात नसते आणि रेश्माने आपले स्वप्न पूर्ण केले.
समाजातील मुलींना तिचे हेच सांगणे आहे की स्वप्न बाळगा,मनात जिद्द ठेवा,मेहनत करा आणि समाजाला पुढे नेण्यासाठी मुलींनी पुढे या.
https://www.navrashtramarathi.in.net
मुख्य संपादक - देविदास वायाळ पाटील
बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा
मो.9834285153
ई-मेल -navrashtramarathinews@gmail.com


Post a Comment
0 Comments