ताज्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
मुख्यसंपादक - देविदास वायाळ
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात 6 महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली गायब झाल्याचे पुढे आले आहे. त्यात त्यांची मानवी तस्करी केली जात असल्याची धक्कादायक माहीती हाती आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात सहा महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली गायब झाल्याचे पुढे आले आहे. त्यात त्यांची मानवी तस्करी (Yavatmal Crime News) केली जात असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात एक मुलगी आणि तिचा प्रियकर यांच्यातील संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप (Audio Clip) समोर आली आहे. त्यात कशा पध्दतीने मानवी तस्करी (Crime News)केली जाते, हे सांगितलं जातं आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी हा राळेगावमधील मजहर कुरेशी असल्याचा दावा करण्यात आला.
दरम्यान, यवतमाळच्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला आहे. अल्पवयीन मुलींना परराज्यात विकले जात असल्याचा गंभीर आरोप करत देह व्यापार, मानवी तस्करी यांसारखे गंभीर प्रकार सुरू असल्याचा अतिशय धक्कादायक दावा प्रफुल चव्हाण यांनी केला आहे. अशातच, चव्हाण यांच्या आरोपांची आदिवासी विकास मंत्र्यांकडून दखल घेण्यात आली असून मंत्री डॉ. अशोक उईकेंनी (Ashok Uike) या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतलीय.
Ashok Uike : आदिवासी विकास मंत्र्यांकडून दखल, अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट
मंत्री डॉ. अशोक उईके यांनी पोलीस अधीक्षक अशोक थोरातांना या प्रकरणी तपासाच्या सूचना दिल्या आहेत. मात्र आदिवासी मंत्र्यांच्या तक्रारीनंतरही अजून या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मंत्री अशोक उईकेंची उपविभागीय अधिकारी बन्सल यांच्याशीही या प्रकरणी चर्चा झाली असून या प्रकरणात जातीने लक्ष घाला, वेगानं तपास करा, अशा उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नेमकी काय कारवाई केली जाते, आणि तपासाअंती नेमकी काय माहिती समोर येतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्याकडून गंभीर आरोप, गृह विभागकडे दिली माहिती
दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांनी त्याला सोडून दिले आहे. त्यांनतर तो तेलंगणामध्ये पळून जात असताना त्याला पुन्हा पकडले गेले. यात पोलिसांनी आरोपीला मदत करणाऱ्या पोलिसांना तपासापासून दूर ठेवावे, तसेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. यात आदिवासी मुलींना त्याच्या पालकांना पैश्याचे आमिष देऊन अश्या पध्दतीने फूस लावली जात आहे. ही गंभीर बाब आहे. आम्ही गृह विभागकडे याबाबत माहीती दिली आहे. राज्य सरकार सुद्धा गंभीर आहे. यात लवजिहाद, धर्मांतर असा अँगल असू शकतो, याचे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्याकडून करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments