Type Here to Get Search Results !

ग्राम कुंभेफळ येथील घरकुल भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचपती राजेश इंगळे यांनी अखेर सोडले उपोषण!

मुख्य संपादक देविदास वायाळ - 9834285153

ई-मेल -navrashtramarathinews@gmail.com


काही दिवसापूर्वी ग्राम कुंभेफळ येथे घरकुल वाटप झाला होता त्या घरकुल लाभार्थी बिले काढण्यासाठी अभियंत्यांनी सरपंचांच्या माघारी खोट्या सह्या केल्या आणि बिले काढली सदर घरकुल लाभार्थ्यांना अर्धवट घरकुल तर काहींना न बांधता निधी दिला गेला होता.


सदर घरकुल लाभार्थी महाघोटाळ्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात सरपंचपती राजेश इंगळे उपोषणास बसले होते की सदर घरकुल घोटाळ्यातील अधिकारी, कर्मचारी व रोजगार सेवक यांची कसून चौकशी व्हावी व कठोर शिक्षा व्हावी या साठी कार्यालया समोर मागील तीन दिवसापासून उपोषण सुरु केले होते.मात्र शेवटी चौथ्या दिवशी समिती नेमून चौकशी करण्याच्या आश्वानानंतर उपोषण मागे घेतले.


माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आमचे वरिष्ठ नेते बुलढाणा जिल्ह्याची मुलुख मैदानी तोफ, मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील मुलुख तोप,, जिल्हा संपर्क अध्यक्ष, तथा प्रदेश सरचिटणीस, माननीय बाळा शेडगे साहेब यांच्या आदेशानुसार आज फोन द्वारे प्रकल्प संचालक सर्व बुलढाण्याची टीम अधिकारी यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ,, कुंबेफळ नगरीचे सरपंचपती राजेश इंगळे, कार्यसम्राट जनसेवक,, माजी जिल्हा उपाध्यक्ष मनसे, तथा विद्यमान महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांनी आपले संपर्क नेते बाळा शेडगे साहेब यांना फोन द्वारे विचारपूस करून साहेबांनी प्रकल्प संचालक यांना धारेवर धरून मनसेच्या सरपंचाला दहा दिवसाच्या आत न्याय नाही भेटला तर मनसे स्टाईल खळ खट्याक आंदोलन छेडण्यातील असा शेडगे साहेब यांनी असा इशारा देता प्रकल्प संचालक व त्यांची टीम होकार देऊन आपण आपल्या मनसेच्या सरपंचाला न्याय देण्याचे काम दहा दिवसांच्या आत करू आमच्या प्रशासनाला सहकार्य करा ही माननीय संपर्क अध्यक्ष शेडगे साहेब यांना विनंती केली यांच्या आदेशानुसार सरपंच महोदय यांनी तूर्तास उपोषण स्थगीत केले तसेच प्रमुख उपस्थित म्हणून बुलढाणा तालुका अध्यक्ष अमोलजी रिंढे तसेच मनसे पदाधिकारी उपस्थित राहून उपोषण सोडवण्यात आले.


साहेबांचा एकच कॉल मॅटर सॉल,, जिथे विषय गंभीर तेथे मनसे खंबीर!असा नारा देण्यात आला.


सरपंच पती यांची मागणी एकच आहे भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी.

Post a Comment

0 Comments