Type Here to Get Search Results !

लाच स्वीकारताना पंचायत समितीतील महिला कनिष्ठ अभियंत्याला ACB कडून अटक

आंतरराष्ट्रीय,

राष्ट्रीय,

महाराष्ट्र,

राजकीय,

खेळ,

क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


संपादक -



अकोला - जिल्हपरिषद बांधकाम विभागातील रस्ते बांधकामाचे थकीत बिल काढून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समितीतील महिला कनिष्ठ अभियंत्या जया इंगोले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी रंगेहात अटक केले आहे.


अटक करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव जया पांडुरंग इंगोले (वय ४९ वर्षे) असे आहे. त्या पंचायत समितीच्या बांधकाम विभागात अभियंता या पदावर कार्यरत होत्या.


तक्रारदाराने सन २०२४ मध्ये ११० मीटर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण केले होते. मात्र या कामाचे बिल काढून देण्यासाठी इंगोले यांनी ३०,००० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २७ एप्रिल २०२६ रोजी ACB कार्यालयात तक्रार दाखल केली.ACB च्या पथकाने २८ एप्रिल रोजी सापळा रचून पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:२७ ते १२:०४ दरम्यान पंचायत समिती कार्यालयातील बांधकाम विभागात सापळा लावण्यात आला.


अटक करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून ३०,००० रुपये स्वीकारताना जया इंगोले यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले.

Post a Comment

0 Comments