आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
बुलढाणा : बुलढाण्यात राष्ट्रवादी मध्ये नाराजी नाट्य. विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळावे म्हणून बरेच नेते आपापल्या पक्षातील नेतृत्त्वाची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु अनेक बड्या नेत्यांना डावलून काही नशीबवान नेत्यांनाच या निवडणुकीचे तिकीट मिळाले. त्यामुळे आता नाराजीनाट्य सुरू झाले आहे. या नाराजीनाट्याचा पहिला धक्का राष्ट्रवादी पक्षाला बसला आहे. तब्बल 90 सामूहिक राजीनामे आल्याने या पक्षाला जबर धक्का बसला आहे.
पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे.
गेल्या अनेक वर्षांपासून विधानपरिषदेवर जाण्याची त्यांची इच्छा आहे. परंतु यावेळीही त्यांना संधी देण्यात आली नाही. म्हणूनच आपली नाराजी व्यक्त करत 90 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. आज बुलढाण्याती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार होती. परंतु या सामूहिक राजीनाम्यांमुळे ही बैठक रद्द करण्याची नामुष्की पक्षावर ओढवली आहे. नाराजी असल्याने पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यासमोरच घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
पालकमंत्री मकरंदआबा पाटील यांचेकडे सोपावले राजीनामे.
मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील प्रमुख नव्वद पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या सर्व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे आपले राजीनामे सोपवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एड नाझेर काझी यांना विधानपरिषद उमेदवारी न मिळाल्याने या पदाधिराऱ्यांनी आपल्या सदस्यात्वाचे राजीनामे दिले आहेत. काझी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत.

Post a Comment
0 Comments