आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मेहकर | तालुका प्रतिनिधी : शिवाजी औदगे
मेहकर तालुक्यातील उकळी शिवार चोरट्यांच्या निशाण्यावर आले आहे! रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात धुमाकूळ घालत स्टार्टर, विद्युत केबल आणि स्प्रिंकलरच्या तोट्या लंपास केल्या आहेत. सलग चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शिवदास शंकर बोरे, दिगंबर रामराव बोरे, रामजी रामकिसन बोरे, उद्धव बोरे, गणपत बोरे, संतोष हरिभाऊ बोरे, योगेश संजय बोरे, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य चोरीला गेल्याची माहिती आहे.
चोरट्यांना रान मोकळे आणि शेतकरी मात्र हैराण, अशी परिस्थिती उकळी शिवारात निर्माण झाली आहे. मेहनतीने उभ्या केलेल्या शेतीसाठीचे साहित्य चोरीला जात असताना प्रशासनाने आणखी किती चोरीची वाट पाहायची, असा सवाल संतप्त शेतकरी उपस्थित करीत आहेत.
चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन मुसक्या आवळाव्यात आणि उकळी शिवारात रात्रीची गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
नवराष्ट्र मराठी | मुख्यसंपादक: देविदास वायाळ,


Post a Comment
0 Comments