Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

कोरडा दुष्काळ जाहीर करा; वाळलेली पिके घेऊन शिवसेना (उबाठा) कलेक्टर कार्यालयावर,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


बुलढाणा | प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यात पावसाने मोठा खंड दिल्याने शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. पावसाअभावी खरीप पिके वाळत असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून भरीव आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.




यावेळी वाळलेली पिके सोबत आणून शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे वेधण्यात आले. पावसाचा खंड, पिकांची होत असलेली नासाडी आणि वाढता आर्थिक ताण लक्षात घेऊन शासनाने तातडीने दुष्काळी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.


शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, पक्ष प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, नरेंद्र खेडेकर आणि जिल्हा समन्वयक गजानन धांडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले.


शेतकऱ्यांना तातडीने मदत, पीक नुकसानीचे पंचनामे, दुष्काळी सवलती आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad