आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठीची दुसरी यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील ३ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
पात्र शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. ही यादी जिल्हानिहाय आणि बँकनिहाय प्रसिद्ध करण्यात आली असून, संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्येही ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना १०,११४ कोटींची कर्जमुक्ती,
पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर १० हजार ११४ कोटी ९० लाख रुपये कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.
७ ऑगस्ट २०२६: ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५,०२८ कोटी ६० लाख रुपये,
२४ ऑगस्ट २०२६: ६ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना ५,०८६ कोटी ३० लाख रुपये,
आधार प्रमाणीकरण कसे करावे?
दुसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम तपासावी आणि नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.
आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असली तरी दिलासा,
राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्जे निरंक करण्यात येणार आहेत.
विभागनिहाय पात्र लाभार्थी,
विभाग
लाभार्थी
छत्रपती संभाजीनगर
१,९५,८९९
अमरावती
७१,७९६
नागपूर
३४,५२०
नाशिक
२५,४७१
पुणे
२३,११७
कोकण
४,८११
एकूण
३,५५,६१४
पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #कर्जमुक्ती #MahaDGIPR #FarmerWelfare #DBT


Post a Comment
0 Comments