आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याने खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत काही नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.मात्र, या भीषण दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
आग नेमकी कशामुळे लागली? रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्था पुरेशी होती का? याबाबत तपास सुरू आहे.या घटनेमुळे नवजात बालकांच्या सुरक्षेचा आणि रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.मृत नवजात बालकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दिवंगत चिमुकल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.
Post a Comment
0 Comments