Type Here to Get Search Results !

फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना झटका; कृषीपंपाला नवीन वीज जोडणी देणे केले बंद,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक: 

वर्धा : जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना शेतात विहिरी खोदून बांधकाम केले आहे. यातील काही विहिरी स्वखर्चातून तर बहुतांश विहिरी विविध शासकीय योजनेतून पूर्ण झाल्या आहेत. आता शेतकऱ्यांनी सिंचनाकरिता कृषीपंपाकरिता महावितरणकडे विद्युत जोडणीसाठी अर्ज केला.तातडीने डिमांडही भरले पण, दोन ते तीन वर्षापासून पुरवठा मिळाला नाही. आता तर हद्दच पार केली, शेतकऱ्यांनी भरलेल्या डिमांडचे पैसे परत करुन नवीन जोडणी देण्यास नकार देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत किसान सभेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.




आम्हाला सोलरपम्प सक्ती नको विजजोडणी द्या,

शेतातील उत्पन्न दुप्पट व्हावे आणि आर्थिक प्रगती साधली जावे, या उद्देशाने शासनाकडून शेतामध्ये विहिरी बांधून दिल्या. काही शेतकऱ्यांनी बारामाही पिके घेता यावी, यासाठी कर्ज घेऊन विहिरीचे बांधकाम केले. विहिरीवरून शेतामध्ये ओलित करता यावे, म्हणून महावितरणकडे दोन ते तीन वर्षांपूर्वी अर्ज करुन डिमांडही भरले.पण, विद्युत जोडणी मिळाला नाही, अखेर आता डिमांडची रक्कम परत करण्याचा सपाटा लावला आहे. डिमांड परत घेण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला जात आहे. ज्यांनी रक्कम परत घेण्यास नकार दर्शविला त्यांच्या घरी रजिस्टर्ड पोस्टाने कद्वारे डीमांड परत केली जात आहे. सोबतच तुम्ही सोलरपंप बसवा, अशीर सक्ती केली जात असल्याचे किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे यांनी निवेदनात म्हटले आहे.


महावितरचा कमिशन मिळवण्यासाठी खटाटोप,

ज्या शेतकऱ्यांनी महावितरणकडे डिम भरले आहेत त्यांना विनाविलंब विद्युत पुरवठा देण्यात यावा. विद्युत जोडणी घ्यायची की सोलर पंप वापरायचा हा पूर्णतः शेतकऱ्यांचा ऐच्छिक विषय आ त्यासाठी सक्ती करु नये. केवळ सोल कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कमिश मिळविण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांचा हा खटाटोप असल्याचा आरोप किसान सभेच्या वतीने केला आहे.


विद्युत पुरवठा करण्यात सरकार ठरले अपयशी,

स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटूनही सरकार शेतकऱ्यांना पुरेशी वीज देण्यात अपयशी ठरले आहे. वीज कंपनी शेतकऱ्यांना जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. आधीच शेतकरी आर्थिक अडचण, नापिकी, अतिवृष्टी, बोगस बियाणे, शेतमालाला हमी दर नसल्याने आत्महत्यांकडे वळतो आहे.आणि पेमेंट परत करत आहात ?


आंदोलनाचा इशारा,

शासन आत्महत्या थांबवण्यासाठी विविध योजना आखते पण, महावितर कृषीपंपाकरिता विद्युत पुरवठा न देता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा बोरगाव येथील महावितरणच्च कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.


 राज्यातील वंचित शेतकरी नवीन विज जोडणीच्या प्रतीक्षेत,

वर्ध्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातही सरकारकडून सोलरपम्प सक्ती केली जात असून वर्ध्यासारखी परिस्थिती असतांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवीन विजजोडणी कलेक्शन देणे बंद करणे म्हणजे एकप्रकारची हुकूमशाही महावितरण करीत आहे. जिथे सोलर काम करत नाही तिथे शासनाने लक्ष घालून शेतकऱ्यांना नवीन विजजोडणी कलेक्शन द्यावे अशी संपूर्ण महाराष्ट्रातील वंचित शेतकऱ्याकडून मागणी होतांना दिसत आहे. शासनाने सोलरपम्प सक्ती न करता नवीन विजजोडणी कलेक्शन खुले करावे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad