आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
दिल्ली: जंतरमंतर वर पेपरफुटी प्रकरणात चालू असलेले आंदोलन चालू असतांना एकीकडे सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया दिली. 26 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला असून आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. सोनम सर, आपल्या असामान्य धैर्याला आणि त्यागाला मनापासून सलाम. स्वतःचा जीव धोक्यात घालून आपण संपूर्ण देशाच्या विवेकाला जागृत केले. आपले जीवन या देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे, असं अभिजीत दीपके म्हणाले. तसेच कॉकरोच जनता पार्टीचे जंतर-मंतर येथे सुरू असलेले शांततापूर्ण आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत सुरूच राहणार आहे, असंही अभिजीत दीपके यांनी सांगितले.


Post a Comment
0 Comments