आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
अयोध्या : सोन्याचा मुलामा असलेली व आपण दान दिलेली 'रामचरितमानस'ची प्रत चोरीला गेल्याचा दावा माजी केंद्रीय गृहसचिव लक्ष्मी नारायण यांनी केला आहे. ८ एप्रिल २०२४ रोजी राम मंदिर ट्रस्टला ही सव्वा क्विंटल वजनाची रामचरितमानस भेट दिली होती. ३-४ महिन्यांनंतर मंदिरातून ही प्रत गायब झाली. या रामचरितमानसच्या १००० पानांवर २४ कॅरेट सोन्याचा थर असून किंमत ५ कोटी रुपये होती. लक्ष्मी नारायण म्हणाले, ८ एप्रिल २०२४ रोजी मी राम मंदिर ट्रस्टला रामचरितमानस भेट दिली होती. तीन महिन्यांनंतर जेव्हा माझे नातेवाईक अयोध्येला गेले, तेव्हा त्यांना तेदान दिले, विसरून जा.... असे बोलले.
हेच ते सोन्याचा मुलामा असलेले रामचरित मानस.
मी यूपी (उत्तर प्रदेश) सरकारच्या एका सल्लागाराशीही बोललो. ते म्हणाले की, तुम्ही दान दिले आहे, आता ते विसरून जा... मी दिलेल्या दानाची पावती देखील मला मिळालेली नाही, असे नारायण म्हणाले. रामचरितमानस तिथे दिसली नाही. यानंतर मी स्वतः अयोध्येला गेलो. चंपत राय यांनी मला ९ तास ताटकळत ठेवले. त्यावर ते म्हणाले, माझ्याकडे अनेक लोकांचे दागिने येतात. मग मी फक्त याच गोष्टींचे प्रदर्शन मांडत बसू का? असे उद्धट बोलले.असे नारायण यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments