Type Here to Get Search Results !

आज सकाळच्या पावसाने आळंदीत इंद्रायणी नदीला पूर; पीएमपीएमएल बसस्थानक पाण्याखाली, नागरिकांचा संपर्क विस्कळीत,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

पुणे: संतनगरी आळंदी येथे मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरले आहे. पुराच्या पाण्यामुळे आळंदीतील पीएमपीएमएल मुख्य बसस्थानक पाण्याखाली गेले असून बससेवेवर मोठा परिणाम झाला आहे.





बसस्थानक परिसर जलमय झाल्याने पुणे शहराकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांचा संपर्क विस्कळीत झाला आहे. अनेक प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना नदीकाठच्या भागात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूरस्थितीमुळे वारकरी, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. हवामान आणि पाण्याची पातळी लक्षात घेऊन नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad