मुंबई: सरकार किती लबाड, ढोंगी, दांभिक आणि विश्वासघातकी आहे हे आज पुन्हा सिद्ध झालं. शेतकरी कर्जमाफी संदर्भात नेमलेल्या समितचे प्रमुख मा. प्रवीणसिंह परदेशी साहेब यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या विनाअट सरसकट कर्जमाफीसंदर्भात आज सकाळी 10.30 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. ठरल्यानुसार नेते मंडळींच्या शिष्टमंडळासमवेत सर्वजण वेळेत उपस्थित होते, परंतु या बैठकीसाठी एकही प्रमुख अधिकारी उपस्थित राहिला नाही आणि आयत्या वेळी बैठक रद्द झाल्याचं फोनवर सांगण्यात आलं. हे अत्यंत संतापजनक आहे. सरकारच्या आदेशाशिवाय कोणताही अधिकारी अशी हिंमत करणार नाही. हा केवळ आमच्या शिष्टमंडळाचा अवमान नाही तर राज्यातील तमाम शेतकऱ्यांची जणू सरकारने चालवलेली ही घोर थट्टा आहे अस आजच्या रद्द झालेल्या बैठकीतून दिसत आहे.
मी (रोहित पवार), महादेव जानकर, आमदार क्षीरसागर व इतर शेतकरी नेते बैठकीसाठी उपस्थित असतांना अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीसोबत मूक संवाद साधण्याची वेळ या सरकारने आमच्यावर आणली. आता शेतकऱ्यांनाही विनंती आहे की, या विश्वासघातकी सरकारमुळं येणारं वर्ष अत्यंत अडचणीचं ठरणार आहे. त्यामुळं या फसव्या कर्जमाफी योजनेविरोधात आम्ही तर लढतच आहोत, पण तुम्हालाही हा संघर्ष पुढं घेऊन जावं लागणार आहे.असं रोहित पवार यांनी बोलून दाखवलं आहे.
#विनाअट_सरसकट_कर्जमाफी
#विश्वासघातकी_सरकार

Post a Comment
0 Comments