आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
मुंबई: पुण्यस्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वार्षिक ६००० रुपयाची मदत यामुळे थांबेल.यामुळे कर्जमाफी लाभ घेणारे ५६ लाख शेतकरी नमो योजनेतून एका वर्षासाठी बाद होणार आहेत. तर दुसरीकडे कृषी विभाग कमी लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी चालू ठेवण्याचा विचार करत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’चा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा लाभ नाकारण्यात येत आहे. त्यामुळे, आधीच संवेदनशील बनलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय आणखी तापण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या (पीएम किसान) धर्तीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ जून २०२३ पासून नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राज्यात सुरू केली होती.


Post a Comment
0 Comments