आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
मुंबई: शेतकऱ्यांच्या विनाअट सरसकट कर्जमाफीसंदर्भात ठरल्यानुसार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा झाली. कर्जमाफीसाठी नेमलेल्या परदेशी समितीकडून आलेल्या आकडेवारीनुसार कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं, परंतु सध्याच्या अटीशर्तीनुसार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याचं आकडेवारीसह आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिलं आणि हा अन्याय दूर करण्यासाठी तातडीने या अटीशर्ती काढण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं. प्रामुख्याने २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची मर्यादा, प्रोत्साहनपर अनुदान देताना सलग दोन वर्षे नियमित कर्ज भरण्याची अट आणि आवश्यक ट्रीगरसह १ रुपयांत पीकविमा योजना या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली.अस रोहित पवार यांनी सांगितलं.
या सर्व मुद्द्यांवर पुढील आठवड्यात परदेशी समितीसोबत चर्चा करून आमच्या मागणीप्रमाणे कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी आश्वासित केलं. त्यामुळं या बैठकीतून नक्कीच सकारात्मक मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे आणि नाही निघाला तर कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचाच आमचा प्रामाणिक प्रयत्न कायम राहील, यात शंका नाही. यावेळी मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्यासह ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब, आ. संदिप क्षीरसागर, आ. कैलास पाटील, आ. राजू खरे, आ. अभिजित पाटील, डॉ. अनिकेत देशमुख हेही उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments