आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
उत्तरप्रदेश: उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले सीआरपीएफ जवान राजन यादव यांना जंतर मंतरवर वरील आंदोलन स्थळी कर्तव्यास जाण्याचा आदेश मिळाला आहे. मात्र त्यांनी आंदोलन स्थळी कर्तव्यास जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी म्हटले की आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीत मला कर्तव्यावर हजर होण्याचे आदेश मिळाले. उत्तरप्रदेशचे रहिवासी असलेले सीआरपीएफ जवान राजन यादव भावूक झाले आणि म्हणाले, "माझ्या मुलानेही तीच परीक्षा दिली आहे.ज्या विद्यार्थ्यांमध्ये मला माझी स्वतःची मुले दिसतात, त्यांच्यावर मी माझी काठी कशी चालवू शकेन? जर मी माझी काठी चालवली, तर प्रत्येक फटका माझ्याच मुलाला बसेल.
पुढे ते म्हणाले, मी माझ्या गणवेशाचा आदर करतो, मी माझ्या कर्तव्याचा आदर करतो, पण निष्पाप विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याची माझी सद्सद्विवेकबुद्धी मला परवानगी देत नाही. यामुळे माझी नोकरी गेली तरी मला चालेल.पण मी माझ्याच देशाच्या भविष्यावर माझी काठी चालवू शकत नाही. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला पाहिजे, तो धमक्या देऊन दाबला जाऊ नये."

Post a Comment
0 Comments