Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

पूर्वीचा लाभ घेतला म्हणून नव्या कर्जमाफीपासून वंचित का?; आमदार कैलास पाटील यांचा सरकारला सवाल,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

 मुंबई: २०१९ मध्ये महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना २०२६ मधील प्रस्तावित कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याची टीका आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. नैसर्गिक संकटे, नापिकी आणि आर्थिक अडचणींनी होरपळलेल्या शेतकऱ्यांवर असा भेदभाव करणे योग्य नसल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला.




आमदार कैलास पाटील म्हणाले की, आमदार, मंत्री आणि सरकारला पुन्हा पुन्हा जनतेचा कौल हवा असतो, मग शेतकऱ्यांना पुन्हा मदत देण्यात आक्षेप का असावा? २०१९ मध्ये कर्जमाफी मिळाली म्हणून २०२६ मध्ये मदत नाकारण्यामागचा निकष काय आहे, याचे उत्तर सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.


त्यांनी पुढे सांगितले की, शेतकरी हौसेने थकबाकीदार होत नाही. अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, वाढता उत्पादन खर्च, बाजारभावातील घसरण आणि आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहतो. अशा परिस्थितीत जुन्या कर्जमाफीचा आधार घेऊन नव्या मदतीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवणे हा घोर अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले.


राज्य सरकारने २०१९ मधील कर्जमाफी लाभार्थ्यांना २०२६ च्या कर्जमाफीतून वगळण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि या निर्णयामागील कारण स्पष्ट करावे, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांबाबत भेदभाव न करता सर्व पात्र शेतकऱ्यांना समान न्याय देण्याचे आवाहनही त्यांनी सरकारला केले.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad