Type Here to Get Search Results !

लाचखोर तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; ६ लाख ४० हजारांची लाच घेताना विजय चव्हाण यांना रंगेहात केलं अटक, ​

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक :

​अंबड (जालना): एकीकडे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्याचा आव आणणारे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय चव्हाण अखेर मोठे लाचखोर निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शनिवारी सायंकाळी एक धडक कारवाई करत तहसीलदार विजय चव्हाण यांना ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे संपूर्ण जालना जिल्हा आणि महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.




​नेमके प्रकरण काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाया केल्या होत्या. परंतु, या कारवाईच्या दुसऱ्या बाजूला ते याच वाळू माफियांकडून हप्ते मागत असल्यामुळे वाळू व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले होते.अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलँड मशीनवर कारवाई न करण्यासाठी, तसेच ६ हायवा वाहने विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार चव्हाण यांनी संबंधित तक्रारदाराकडे तब्बल ७ लाख रुपयांच्या मासिक हप्त्याची (Monthy Percentage) मागणी केली होती.


​अशी झाली कारवाई...

​एकीकडे वाहनांवर कारवाईची भीती आणि दुसरीकडे तहसीलदारांचा लाखो रुपयांचा हप्ता, हे दोन्ही भरणे शक्य नसल्यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रीतसर तक्रार नोंदवली.तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी सापळा रचण्यात आला. तडजोडीअंती ठरलेली ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने तहसीलदार विजय चव्हाण यांना रंगेहात दबोचले. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चितमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad