आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
बुलढाणा: सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी मंत्री मा.डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची तुतारी सोडून कमळ हाती घेणार असल्याची सूत्रांकडून खात्रीलायक माहिती मिळाली आहे.सदर माहिती ही सोसिअल मीडिया मधून वायरल होताना दिसत आहे.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती !
माजी मंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे हे भाजपमध्ये प्रवेश करून कमळ हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मा.डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे सोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. पुढील काही दिवसात डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजप पक्ष प्रवेश करण्याचे कारण जिल्हाबँकेचा विकास असण्याची दाट शक्यता आहे.
जिल्ह्यात संघटनात्मक ताकद,
डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांची संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात खूप मोठी ताकद आहे.कार्यकर्त्याचा जोड जमाव व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ते विदर्भातील एकमेव नेते मानले जातात.त्यातच जिल्हा बँक हा त्यांचा राजकारणाचा मुख्य स्तोत्र आहे. पक्षश्रेष्टीच्या आदेशानुसार साहेबांनी लोकसभा निवडणुकीला दोन वेळा राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर बुलढाणा लोकसभा लढवलेली होती. परंतु त्यांना लोकसभा निवडणूकित यश आले नव्हते.मात्र त्यांनी राष्ट्रामाता जिजाऊ यांच्या सिंदखेडराजा मतदारसंघावर चार वेळा आमदार म्हणून निवडणूक जिंकलेली आहे. आणि दोनवेळा राज्यात केंद्रीय मंत्री म्हणून महत्वाची भूमिका बजावलेली आहे.
आता मा.डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब पुढील काही दिवसात काय निर्णय घेतात व काय घडामोडी घडतात पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Post a Comment
0 Comments