आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
मुंबई: कल्याणमध्ये पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. येथे सेक्स रॅकेट चालवण्याच्या एक महिला वकील मनिषा नांदे हीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी या कुंटनखान्यातून दोन पीडित तरूणींची सुटका केली. ठाणे गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी कक्षाने ही कारवाई केली. मनिषा नांदे ही कल्याण आणि पनवेल येथील न्यायालयांमध्ये वकिली व्यवसाय करते. या घटनेने कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, कल्याण पूर्वेकडील तिसगाव नाका परिसरातील नामांकित हॉटेल उडुपी पॅलेस येथे गेल्या 3 महिन्यांपासून एक उच्च शिक्षित महिला देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या हॉटेलमध्ये छापा टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मानवी तस्करी विरोधी पथकाने आधी बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठवून खात्री केली.
खात्री पटल्यानंतर मानवी तस्करी विरोधी पथकाने सापळा रचला. पोलिसांनी 27 जून रोजी बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठविले. हॉटेलमध्ये पीडित तरूणी बरोबर व्यवहार ठरल्यानंतर बनावट ग्राहकाने पोलिसांना इशारा दिला. यानंतर बाहेर असलेल्या पोलिसांनी हॉटेलमध्ये घुसून छापा टाकला. अचानक पोलीस हॉटेलमध्ये आल्याचे पाहून व्यवस्थापकासह कामगार, ग्राहकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी कोणालाही पळून जाण्याची संधी दिली नाही. या कारवाईत दोन पीडित तरुणींची ताब्यात घेण्यात आले. तर वकील मनीषा नांदे हीला अटक केली.
या प्रकरणात या वकील मनीषा कांदेने आणखी किती तरुणींना या सेक्स रॅकेटच्या व्यवसायात ओढले?, किती वर्ष या हॉटेलमध्ये देहविक्री व्यवसाय चालविला. वकील महिलेला अन्य कोणाची साथ आहे. त्याच बरोबर हॉटेल चालकाचा यामध्ये सहभाग आहे? याचा तपास कोळसेवाडी पोलिस करत आहेत. या रॅकेटमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणाबाबत पोलिस निरीक्षक एस. जी. नाईक यांनी कारवाईची माहिती दिली असून तपास पूर्ण झाल्यानंतर आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment
0 Comments