आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
सातारा: साताऱ्यात रविवारी ‘नीट-यूजी’ फेरपरीक्षेच्या वेळी एक परीक्षार्थी मुलगी जॅकेट घालून केंद्रावर आली. यावेळी मार्गदर्शक नियमावलीचा आदेश पाळत केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी तिला जॅकेट काढण्यास सांगितले. मात्र, मुलीने जॅकेट काढणार नसल्याचे सांगत चक्क परीक्षा देणेच टाळले. या प्रकाराने तिचे पालकही अचंबित झाले.
साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात रविवारी ‘नीट-यूजी’ परीक्षा केंद्र होते. एक मुलगी परीक्षेच्या प्रवेशद्वाराजवळ गेली. तिला जॅकेट काढायला लावले. मात्र, तिने जॅकेट काढायला नकार दिला. जॅकेट पालकांकडे द्या आणि आतमध्ये या, असे तेथील महिला कर्मचाऱ्यांनी मुलीला सांगितले. परंतु तिने जॅकेट काढण्यास ठाम नकार दिला. तातडीने तिने परीक्षा केंद्र सोडले. तिच्यासोबत आई-वडील होते. दुचाकीवर बसून आई-वडील मुलीला घेऊन घरी निघून गेले आहे.

Post a Comment
0 Comments