Type Here to Get Search Results !

उकळी गावचे सुपुत्र बजरंग खरात यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती, उद्या राष्ट्रपतीच्या उपस्तितीत नेमणूक,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


ता. प्रतिनिधी: शिवाजी औदगे,

 मेहकर: उकळी गावचे सुपुत्र "कॅडेट बजरंग विश्वासराव खरात" यांनी भारतीय सैन्यामधे सेवा करत असताना कठोर परिश्रम, जिद्द आणि अनेक वर्षांच्या खडतर मेहनतीच्या बळावर एक ऐतिहासिक यश संपादन केले आहे.त्यांची उदयाला दिनांक १३ जून २०२६ रोजी भारतीय सैन्य अकादमी, (IMA) डेहराडून (Dehradun) येथे होणाऱ्या Passing Out Parade मध्ये, मा. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत, बजरंग विश्वास खरात याची भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती होणार आहे. यासोबतच ते भारतीय सैन्यातील Class-I Gazetted Officer म्हणून देशसेवेत दाखल होणार आहे.




विशेष अभिमानाची बाब म्हणजे,बुलढाणा जिल्ह्यातून भारतीय सैन्यात Class-I Officer पद प्राप्त करणारे ते पहिलेच युवक ठरत आहे. त्याच्या या यशामुळे आपल्या उकळी गावाचे तसेच जिल्ह्याचे  नाव उज्ज्वल होणार आहे.अखंड मेहनत, शिस्त, त्याग आणि देशसेवेच्या दृढ संकल्पातून साकार झालेला हा क्षण प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे.


संघर्ष, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रसेवेची जिद्द यांचे हे यशस्वी फलित असून, हा क्षण केवळ बजरंग सर आणि त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे तर आपल्या सर्वांसाठी गौरवाचा आहे.या अभूतपूर्व यशाबद्दल बजरंग खरात यांना व त्यांच्या कुटूंबाला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशस्वी राष्ट्रसेवेसाठी हार्दिक शुभेच्छा!

जय हिंद! जय महाराष्ट्र.....

Post a Comment

1 Comments
  1. काही फेकत जाऊ नका. बुलढाणा जिल्ह्यात या अगोदर खूप मोठे सैन्यात ऑफिसर झालेले आहेत. याउलट बुलढाण्यात मेरा बुद्रुक गावातून जिल्ह्यातला एकमेव fighter pilot आहे. सिंदखेड राजाचे जिजाऊ माता चे वंशज श्री श्रीकांत राजे जाधव सर सुद्धा सैन्यात खूप मोठे ऑफिस आहे. असे खूप आहे. काहीही फेकू नका जिल्ह्यातला पहिला म्हणून.

    ReplyDelete
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad