Type Here to Get Search Results !

लोणार सरोवरासाठी ४३४ कोटीचा निधी मंजूर, आता होणार कायापालट; दुरुस्ती काम त्वरित सुरू करण्याचे आदेश,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक :


बुलढाणा:  जागतिक पातळीवरील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक आश्चर्य, विवर क्षेत्र आणि आंतरराष्ट्रीय रामसार स्थळ असलेल्या लोणार सरोवराचे संवर्धन, जतन आणि ऐतिहासिक वैभव जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने गतीमान पावले उचलली आहे. त्यामुळे संपूर्ण कायापालट करण्यासाठी ४३४.६२ कोटी रुपयांच्या सुधारित जतन व विकास आराखड्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.लोणार सरोवर जतन, संवर्धन आणि विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या सर्व कामांचा आणि आगामी काळातील नियोजित प्रक्रियेचा सविस्तर अॅक्शन




३१ कामे सद्यस्थितीला युद्धपातळीवर,

लोणार सरोवराचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी ४३४.६२ कोटी रुपयाच्या सुधारित जतन व विकास •आराखड्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या भव्य प्रकल्पामध्ये ९ कार्यान्वयीन यंत्रणांचा सहभाग असून, सद्यस्थितीपर्यंत या आराखड्यासाठी २१९.७४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. ज्यामधून २०९.८५ कोटी रुपयांचे वितरण विविध यंत्रणांना करण्यात आले. आराखड्यातील ७६ कामांपैकी ३३ कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली. ३१ कामे सद्यस्थितीला युद्धपातळीवर प्रगतीपथावर आहेत, तर उर्वरित ९ कामे अंदाजपत्रक स्तरावर आहे.


प्राचीन मंदिरे पाण्याखाली,

लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत मागील काही काळापासून निसर्गचक्र आणि अंतर्गत जलस्रोतांमुळे लक्षणीय वाढ झाली आहे. सरोवराचे पाणी सरासरी २० मीटर आतपर्यंत शिरले असून, जलपातळी उन्हाळ्याच्या तुलनेने ३ ते ४ मीटरने वाढल्यामुळे काठावरील काही प्राचीन मंदिरे आणि नैसर्गिक वनसंपदा पाण्याखाली आहे. या परिस्थितीचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि येथील प्राचीन मंदिरांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन अत्यंत वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून काम करीत आहे. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी एक विशेष तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. या अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे तज्ज्ञ भूवैज्ञानिक मे २०२६ ते सप्टेंबर २०२७ यापर्यंत संपूर्ण एक हायड्रोलॉजिकल सायकलचा अभ्यास करणार आहे.


महिन्यात मागवली 'अॅक्शन टेकन रिपोर्ट'

टेकन रिपोर्ट' पुढील ३ महिन्यांत थेट मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांना दिले. जेणेकरून या जागतिक वारशाचा विकास अत्यंत दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण होईल. केंद्रीय वन, पर्यावरण आणि पर्यटन मंत्रालयाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेत लोणार सरोवराच्या पुनरुज्जीवनासाठी यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारत सरकार स्तरावर पाठपुरावा केला. हाच वारसा पुढे नेत आता राज्य सरकारच्यावतीने केंद्र सरकारकडे सादर करावयाचा सविस्तर आणि सर्वसमावेशक आराखडा अधिक परिपूर्ण व मजबूत केला जात आहे. केंद्र सरकारकडे रीतसर प्रस्तावांचा वेगाने पाठपुरावा करून सर्व प्रलंबित प्रक्रियांना गती दिली जात असून, या सर्व नियोजित कामांसाठी प्रत्यक्ष कृती सुरू करण्याचे आदेश दिले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad