आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
www.navrashtramarathi.in.net
जिल्हा प्रतिनिधी:समाधान राठोड,
बुलढाणा: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत राज्य शासनाने २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चा लाभ घेतलेल्या लाखो शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंत मर्यादित लाभ देण्यात येत असल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे.
२०१९ नंतर पुन्हा शेतीसाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मागील काही वर्षांत सततची नापिकी, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, नैसर्गिक आपत्ती तसेच शेतमालाला न मिळालेला हमीभाव यामुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. अनेक शेतकरी प्रामाणिकपणे शेती करत असताना त्यांच्या डोक्यावर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. आज अनेक शेतकऱ्यांची थकबाकी १ ते २ लाख रुपयांपर्यंत पोहोचली असून ती भरण्याची त्यांची आर्थिक क्षमता राहिलेली नाही. सध्याच्या शासन निर्णयानुसार अशा शेतकऱ्यांना फक्त ५० हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. म्हणजे दोन लाख रुपये थकबाकी असलेल्या शेतकऱ्याने आधी दीड लाख रुपये भरायचे आणि त्यानंतर केवळ ५० हजार रुपयांचा लाभ घ्यायचा. ही अट व्यवहार्य नसून त्यामुळे लाखो शेतकरी प्रत्यक्ष कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना मा. तहसीलदार, सिंदखेडराजा यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले. शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन महात्मा फुले कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत २ लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा संघटनेची मागणी नसून राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्काची मागणी आहे. अन्नदाता शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, हीच अपेक्षा.
मुख्यसंपादक: देविदास वायाळ पाटील,

Post a Comment
0 Comments