आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक :
बुलढाणा: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीचे वेळी सातबारा कोरा करू म्हणून विश्वास देणारे, ओरडून सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ ते ७ महिन्यापासून अभ्यास समिती नेमून तब्बल २ वर्षानंतर कर्जमाफी जाहीर केली. परंतु जाहीर केलेली कर्जमाफी ही निव्वळ फसव्या स्वरूपाची आहे असा संताप राज्यातील शेतकरी व संघटनाकडून व्यक्त केला जात आहे.
राज्य शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' मंजूर केली. परंतु शेतकऱ्यांना ती अपुरीच आहे. मुखमंत्र्यांनी बेंबीच्या देठापासून कळा देऊन सांगितलं होत कि शेतकऱ्यांनाचा सातबारा करू कोरा.. कोरा.. कोरा.. परंतु साक्षात मात्र काहीतरी वेगळंच जाहीर केल आहे.आता कर्जमाफी साठी नवीन नियम जाहीर केले आहेत.काय आहेत नियम? कुणाला मिळणार? कुणाला नाही मिळणार?
कोणाला लाभ मिळणार?
ज्या शेतकऱ्यांचे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेले पीक किंवा शेती कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड झालेले नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ! मुद्दल व व्याजासह एकूण थकबाकी 2 लाख रुपयांपर्यंत असल्यास संपूर्ण कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.
कोण अपात्र असतील?
मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी-कर्मचारी, आयकर भरणारे व्यक्ती, तसेच सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, आयकर भरणारे आणि 25 हजार रुपयांपेक्षा जास्त मासिक वेतन असलेले अधिकारी-कर्मचारी यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
सर्वच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी नाही.सरकारने जाचक अटी घातलेल्या आहेत .जो देशाचा पोशिंदा आहे म्हणतात देशाला अन्न पुरवणार,काबाड कष्ट करणारा मायबाप शेतकरी त्याला काहीतरी तोकडा लाभ देताना एवढ्या जाचक अटी घातल्या आहेत आणि करोडपती व्यापाऱ्यांना कर्जमाफ करतांना कोणतीही अट नसते ते मात्र विना अट माफ होते.
शेतकरी पिकवणार तरच देश वाचणार!
सॅल्यूट माझ्या बळीराजा!
किती दुःख सहन करशील!
आता तरी जागा हो!
तुझ्या साठी या दरिद्री सरकारकडे देण्यासाठी काहीही नाही.
तरीही धीर नको सोडू, नको रे आत्महत्या करू,
जग तुझ्या लेकरांसाठी, कुटुंबासाठी, तुझी गरज आहे त्यांना,

Post a Comment
0 Comments