Type Here to Get Search Results !

धोंड्याच्या ताटात अंगठी नाही, माहेरीच पत्नीला मारहाण; पुण्यातील 25 वर्षीय विवाहितेचा भयंकर शेवट,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक :

चारचाकी गाडी, फ्लॅट खरेदीसाठी लाखो रुपयांची रक्कम आणि सोन्याच्या अंगठीची हाव धरत सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आयुष्य संपवले.


पुणे :   पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावणारी घटना समोर आली आहे. चारचाकी गाडी, फ्लॅट खरेदीसाठी लाखो रुपयांची रक्कम आणि सोन्याच्या अंगठीची हाव धरत सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तेजस्विनी गोरख सोनवणे असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.




याप्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तेजस्विनीचे वडील शामराव बाळासाहेब गवळी (वय ५२ वर्षे, व्यवसाय-शेती, रा. मासावाडी रोड, नवीन वांगदरी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती गोरख संभाजी सोनवणे (वय ३२ वर्षे), सासरा संभाजी लक्ष्मण सोनवणे (वय ६२ वर्षे) , सासू अलका संभाजी सोनवणे (वय ५५ वर्षे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


सासरच्या मंडळींचा खरा चेहरा सहा वर्षांनी समोर,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनीचा विवाह 25 जून 2020 रोजी गोरख सोनवणे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस तिला सासरच्यांकडून चांगली वागणूक मिळाली. या दांपत्याला 'विरा' (वय अडीच वर्षे) नावाची एक लहान मुलगी आहे. मात्र, मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींचा खरा चेहरा समोर आला आणि त्यांनी तेजस्विनीचा छळ करण्यास सुरुवात केली. तेजस्विनीच्या छळाची मालिका पैशांच्या हव्यासापोटी सुरू झाली आणि ती दिवसेंदिवस क्रूर होत गेली.


धोंड्यासाठी पाहिजे होती अंगठी,

एप्रिल 2026 मध्ये पती गोरख याला फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यासाठी त्याने पुन्हा तेजस्विनीकडे 3 लाख रुपयांची मागणी केली. तिने हतबलता दाखवताच तिला पुन्हा मारहाण करण्यात आली आणि माहेरच्या लोकांशी संपर्क तोडण्यास भाग पाडले गेले. महिन्याभरातच अधिक मास' (धोंड्याचा महिना) असल्याने तेजस्विनीच्या वडिलांनी जावई आणि व्याहींना परंपरेनुसार जेवणासाठी बोलावले होते. मात्र, आम्हाला सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ, नाहीतर येणार नाही, असा हट्ट पतीने धरला. अखेर ते जेवायला आले, पण तिथेही त्यांनी वाद घालत रागाच्या भरात तेजस्विनीला सर्वांसमोर मारहाण करून शिवीगाळ केली. सासरच्या लोकांची पैशांची आणि वस्तूंची हाव संपत नसल्याने तेजस्विनी प्रचंड मानसिक दडपणाखाली होती.


तेजस्विनीची  घरात गळफास लावून आत्महत्या,

2 जून 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पती गोरख याने तेजस्विनीच्या वडिलांना फोन करून सांगितले की, तेजस्विनीने आतून दरवाजा लावून घेतला असून ती दार उघडत नाहीये, या फोननंतर काही वेळातच तेजस्विनीचे मामा दत्तात्रय बापूराव दाते यांनी फोन करून अत्यंत धक्कादायक बातमी दिली. तेजस्विनीने घरात गळफास लावून आत्महत्या केली होती.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad