आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक :
देश तुमच्या धोरणामुळे अडचणीत आहे असा हल्लाबोल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार रोहित पवार यांनी भाजप व त्यामध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
काँग्रेसचे सरकार असताना पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग असताना प्रती बॅरेल किंमत ही ११० डॉलर होती. त्यावेळी पेट्रोल, डिझेल ६० रुपये प्रती लीटर होते. त्यानंतर २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आले. त्यावेळी प्रती बॅरेल किमत ही ५० डॉलर झाली. त्यावेळी पेट्रोल, डिझेल चे दर ६० रुपयावरून ते ९० रुपये करण्यात आले. त्यावेळी देशातील जनतेच्या खिशातून या दर वाढीतून १० लाख कोटी रुपये या सरकारने कामाविले असा घणाघात आमदार पवार यांनी भाजप सरकारवर घातला.
देश आर्थिक अडचणीत आहे, त्यासाठी चारचाकीचा वापर कमी करा असे आवाहन पंतप्रधान आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री यांनी केले आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र आपण जे प्रती बॅरेल दर कमी झाले त्या दरम्यान जे १० लाख कोटी रुपये कामविले आहेत. ते पैसे आता खर्च करून सर्वसामान्य देशवासियांना महागाई च्या खाईत लोटले जात आहे ते थांबवावे असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

Post a Comment
0 Comments