आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
जिल्हाप्रतिनिधी : समाधान राठोड,
बुलढाणा :देऊळगावराजा शहरात दिवसेंदिवस भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ही समस्या खूप गंभीर होत चालली असून प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.अशातच आता नागरिकांनी उद्या मंगळवारला नगरपरिषदेवर हंडा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.घराघरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. धरणं भरलेली असताना देखील शहरवासीयांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
प्राप्त माहितीनुसार हा हंडा मोर्चा दिनांक १९ मे मंगळवारी सकाळी ९:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासूनन निघून नगरपरिषद येथे जाईल. पाणी प्रश्नासाठी देऊळगाव राजा नगरपरिषदवर आयोजित करण्यात आलेल्या विराट हंडा मोर्चा मध्ये सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आव्हान नगरवाशीयांनी केले आहे.
हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून नगरातील सर्वच नगरवाशियांच्या हक्काचा पाणी प्रश्न आहे.
नवराष्ट्र मराठी न्यूज,
मुख्यसंपादक : देविदास वायाळ,


Post a Comment
0 Comments