Type Here to Get Search Results !

इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणाची आत्महत्या; प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल,

 आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net




मुख्यसंपादक -

लातूर : जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आली आहे. प्रेमप्रकरणातून सुरू झालेल्या वादानंतर इंस्टाग्रामवरून होत असलेल्या धमक्या आणि मानसिक तणावाला कंटाळून एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेत ,आत्महत्या केली आहे, तेजस घोडके अस या तरुणाच नाव असून आत्महत्यापूर्वी सुसाईड नोट लिहित आत्महत्याच कारण सांगितल आहे, तर रेणापूर तालुक्यातील मोरवड येथील हा तरुण आहे,या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. यानंतर सोशल मीडियावरून धमक्या देणे, बदनामी करण्याची भीती दाखवणे आणि सतत मानसिक दबाव टाकला जात असल्याचा आरोप स्वतः मयत तेजस याने सुसाईड नोट लिहून केला आहे.,घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे, दरम्यान या प्रकरणी 4 आरोपी रेणापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर अधिकअधिकचा तपास पोलिस करत आहेत.,

Post a Comment

0 Comments

Top Post Ad