आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक :
खामगाव: घाटपुरी येथील प्रसिद्ध जगदंबा देवी संस्थान (घाटपुरी मंदिर) येथे झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. याप्रकरणी अकोला जिल्ह्यातील एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३ लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची लगट जप्त करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी, म्हणजेच २४ डिसेंबर २०२५ च्या रात्री ९ ते २५ डिसेंबर २०२५ च्या सकाळी ६ वाजेदरम्यान अज्ञात चोराने घाटपुरी येथील जगदंबा देवी मंदिराच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला होता. चोरट्याने मंदिरातील देवी आणि गणपतीच्या अंगावरील ७३,००० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन, खामगाव येथे अप क्र. ३९७/२०२५, कलम ३३१(४), ३०५ (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान तांत्रिक पुरावे आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. अमोल काशीराम तेलगोटे (वय ३९ वर्षे, रा. रिधोरा, ता. जि. अकोला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील सोन्याची २० ग्रॅम २० मिली वजनाची लगट (किंमत ३,२०,००० रुपये) जप्त करण्यात आली आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला मुद्देमालासह शिवाजीनगर पोलीस स्टेशन, खामगाव यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पथकाची कामगिरी,
ही यशस्वी कारवाई बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे,अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड आणि अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.या कामगिरीत पीएसआय पंकज सपकाळे, एएसआय राजेंद्र अंभोरे, महिला पोलीस अंमलदार वनिता शिंगणे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेजोळ, अजिस परसुवाले, मनोज खर्डे, शिवानंद हेलगे आणि कैलास ठोंबरे यांचा समावेश होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईचे खामगाव परिसरात कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments