आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक:
अकोला: "शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत देता येत नाही, आणि आता डिझेलसाठी सातबारा मागून त्याची लायकी काढता काय? हा बळीराजाचा अपमान शेतकरी संघटना सहन करणार नाही!"
आदरणीय शरद जोशी यांनी आम्हाला एकच शिकवण दिली आहे—"भीक नको, घेऊ घामाचे दाम !" पण आजची व्यवस्था शेतकऱ्याला त्याच्या हक्काच्या डिझेलसाठी भिकाऱ्यासारखं रांगेत उभं करायला निघाली आहे. ट्रॅक्टर, पाण्याचा पंप आणि शेतीची अवजारे चालवण्यासाठी डिझेल ही जीवनावश्यक वस्तू आहे. त्यावर 'सातबारा'ची जाचक अट घालणं म्हणजे शेतकऱ्याच्या गचांडीला नख लावण्यासारखे आहे.
मंत्री महोदयांना आणि प्रशासनाला आमचे रोकठोक सवाल,
शेतकरी काय चोर आहे का?
डिझेल पंपावर काळाबाजार करणारे उजळ माथ्याने फिरतात, त्यांना कोणी सातबारा मागत नाही पण शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला गुन्हेगारासारखी वागणूक का? केवळ पोकळ 'इशारे' कशासाठी? कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कारवाईचा इशारा दिला, पण आम्हाला हे पोकळ इशारे नकोत. ही जाचक अट घालणारा तो 'तुघलकी अधिकारी' कोण? त्याला तात्काळ निलंबित करा आणि हा नियम कायमचा कचऱ्याच्या डब्यात टाका!
पेरणी करायची की सरकारी उंबरठे झिजवायचे?
अकोल्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आधीच सुलतानी आणि अस्मानी संकटात होरपळतोय. पाऊस तोंडावर असताना शेतकरी शेतात राबणार की महा-ई-सेवा केंद्रात सातबाऱ्यासाठी हेलपाटे मारणार?
शेतकरी संघटनेचा अंतिम इशारा,
"अकोल्याच्या मातीतून आम्ही सरकारला ठणकावून सांगतो—शेतकऱ्याच्या डिझेलला हात लावाल, तर गाठ शेतकरी संघटनेशी आहे! ही जाचक अट एका रात्रीत रद्द झाली पाहिजे, अन्यथा मंत्र्यांच्या गाड्यांना आणि सरकारी यंत्रणेला शेतात पाय ठेवू देणार नाही. कायदा काय असतो, हे शेतकरी आपल्या भाषेत शिकवेल!"
स्वातंत्र्य आमच्या हक्काचे... नाही कोणाच्या बापाचे!
शेतकरी संघटना - झिंदाबाद!
आदरणीय शरद जोशी - अमर रहे!
शेतकरी संघटना

Post a Comment
0 Comments