Type Here to Get Search Results !

काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक -

गोवा : गोव्यातील काँग्रेस नेते डॉ. केतन भाटीकर यांचे निधन झाले आहे. सर्पदंशाने त्यांचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. गोव्याच्या राजकारणातील एक आश्वासक चेहरा म्हणून केतन भाटीकर यांच्याकडे पाहिले जात होते. अलीकडेच फोंडा पोटनिवडणुकीसाठी केतन भाटीकर काँग्रेसकडून निवडणूक लढवणार होते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.




डॉ. भाटीकर यांच्या पायावर जखमेच्या खुणा,

डॉ. भाटीकर यांच्या पायावर जखमेच्या खुणा आढळून आल्या आहेत, ज्यामुळे सर्पदंशाचा संशय बळावला आहे. मात्र, आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूचे नेमके आणि अधिकृत कारण केवळ शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोग्य प्रशासनाने कुळे पोलीस स्थानकाला पाचारण केले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


गोव्यातील प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि काँग्रेसचे नेते डॉ. केतन भाटीकर यांचे आज (शुक्रवारी १५ मे) सर्पदंशाने दुर्दैवी निधन झाले. फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्या अकाली निधनाने गोव्याच्या राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


नेमकी घटना काय?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. भाटीकर हे काही कामानिमित्त गोवा-कर्नाटक सीमेवरील करमल घाटात उतरले होते. तिथेच त्यांना एका विषारी सापाने दंश केला. त्यांना तातडीने धारबांदोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


राजकीय कारकीर्द,

प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट असलेले डॉ. केतन भाटीकर फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे चेहरा होते. उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष रजा याचिका (SLP) दाखल केली होती, जी सध्या प्रलंबित आहे.


 मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून शोक व्यक्त,

डॉ. भाटीकर यांच्या निधनावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली निधनाचे वृत्त ऐकून मला धक्का बसला. त्यांचे निधन हे वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठे नुकसान आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, "जनसेवेप्रती असलेली त्यांची निष्ठा सदैव स्मरणात राहील. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबासोबत आमच्या संवेदना आहेत.


डॉ. केतन भाटीकर यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. फोंडा पोटनिवडणुकीत भाजपाकडून तिकीट मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु, रवि नाईक यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याच मुलाला तिकीट देण्याचे भाजपाने निश्चित केले. या निवडणुकीत केतन भाटीकर यांचे पारडे जड मानले जात होते. ही निवडणूक झाली असती, तर भाजापाला मोठे आव्हान ठरले असते, असे सांगितले जात आहे. केतन भाटीकर हे फोंडा भागात अत्यंत लोकप्रिय होते. सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असायचा. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच फोंडा आणि धारबांदोडा परिसरात शोककळा पसरली आहे.


दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक्सवर पोस्ट करत केतन भाटीकर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. प्रख्यात फिजिओथेरपिस्ट डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून अत्यंत मोठा धक्का बसला असून, अतिशय व्यथित झालो आहे. त्यांचे जाणे ही वैद्यकीय क्षेत्राची एक मोठी आणि कधीही भरून न येणारी हानी आहे. या अत्यंत कठीण प्रसंगी, त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि मित्रपरिवाराप्रती मी माझ्या मनापासूनच्या संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, असे प्रमोद सावंत यांनी शोक संदेशात म्हटले आहे. तसेच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि अरविंद केजरीवाल यांनीही डॉ. केतन भाटीकर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad