Type Here to Get Search Results !

बंजारा समाजाचे प्रसिद्ध कीर्तनकार रामधन महाराज यांचे चालू भजनातच हृदयावीकाराने निधन,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक -

जालना : बंजारा समाजाचे प्रसिद्ध प्रबोधनकार रामधन महाराज यांचं भजन सुरु असतानाच उष्माघात व हृदयविकाराच्या झटक्याने निधन…


               (हृदयावीकाराचा झटका आला तेंव्हाचा लाईव्ह फोटो.)


 बंजारा समाजावर शोककळा परतूर तालुक्यातील सुरुमगाव तांडा येथील घटना बंजारा समाजाचे थोर प्रबोधनकार रामधन महाराज राठोड यांच्या निधनाने संपूर्ण समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सुरुमगाव तांडा येथे ही हृदयद्रावक घटना घडलीये.. रामधन महाराज हे सुरुमगाव तांडा येथे आयोजित एका कार्यक्रमात बंजारा भजन सादर करत होते.. समाजप्रबोधनाचे विचार मांडत असताना आणि भजनात तल्लीन असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जागेवरच कोसळले..त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली.. भजनाच्या सुरांमध्येच या महान प्रबोधनकाराने अखेरचा श्वास घेतल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad